दृश्य अदृश्य शिवशक्ती अनुभूती
श्रावण म्हणजे पाऊस ..घट्ट नातं श्रावणसरिंसोबत.. पण आज त्याने रौद्ररूप धारण केल...प्रलयाची वेळ... छोटंसं गावं आणि कमी लोकसंख्या. मदतकार्य कुणाकडून मिळणं अगदीच अशक्य...

दृश्य अदृश्य शिवशक्ती अनुभूती
श्रावण म्हणजे पाऊस ..घट्ट नातं श्रावणसरिंसोबत.. पण आज त्याने रौद्ररूप धारण केल...प्रलयाची वेळ... छोटंसं गावं आणि कमी लोकसंख्या. मदतकार्य कुणाकडून मिळणं अगदीच अशक्य..आणि हा बरसणारा बेधुंद होऊन बरसतच होता....
उमा आणि आशुतोष गावातल तरुण, आदर्श, उमद जोडपं..त्यांनी ठरवलं आता गावाला वाचवायचं, इथले जीव वाचले की आपला जन्म सार्थकी....
गुडघ्याईतक पाणी कधी जीवाचा ठाव घेईल कळत नसताना जीवाची बाजी लावत आबालवृद्धांना डोक्यावर, कधी खांद्यावर उचलून नेत उंचावरच्या शिवमंदिरात सुखरूप पोहचवलं...आता शिवशक्तीची आराधना सुरु झाली... त्या रौद्राला थांबवण्यासाठी त्याला शांत करण्यासाठी..
आराधना इतकी मनोमन आणि व्याकुळतेने केली गेली की अखेर ती गडद छाया आणि त्या दाट सरी ओसरल्या... आता मनाचा गाभारा आनंदला... खऱ्या सुखाची ओंजळ भरली गेली... आनंदाच बी पेरलं गेलं साऱ्यांच्या हृदयात आणि खरा श्रावण सुरु झाला.. मनातला, श्वासातला, कणाकणातला...
शिवशक्तीची प्रचिती आली सोबत उमा आशुतोष या समोर दिसणाऱ्या शिवशक्तीला ही म
नोमन कृतज्ञ् होऊन साऱ्यांनी दृश्य, अदृश्य दिव्य शक्तीला नमन करून दिव्यत्वाची प्रचिती अनुभवली ती या भूतलावरच...
What's Your Reaction?






