बाबा...
समीर चे बाबा वारले म्हणून तो दोन दिवसाची सुट्टी घेऊन घरी आला होता गावाकडे आपल्या.. बाबांचा अंत्यविधी पार पाडला तसें सगळी लोक जिकडे तिकडे गेली..समीर आईला लगेच म्हणाला की आई मी उदया निघणार आहे परत जायला, ते तेरावा किंवा दहावं होईपर्यंत मला वेळ नाही थांबायला......

बाबा..
समीर चे बाबा वारले म्हणून तो दोन दिवसाची सुट्टी घेऊन घरी आला होता गावाकडे आपल्या.. बाबांचा अंत्यविधी
पार पाडला तसें सगळी लोक जिकडे तिकडे गेली..समीर आईला लगेच म्हणाला की आई मी उदया निघणार आहे परत जायला,
ते तेरावा किंवा दहावं होईपर्यंत मला वेळ नाही थांबायला आणि इच्छा तर त्याहून नाहीये थांबायची.
असंही त्या माणसाने काही कमावून ठेवलं नाही माझ्यासाठी.. माझ्या मित्रांकडे बघ किती प्रॉपर्टी आहे आज त्यांच्या नावावर,
चैनीत जीवन जगत आहेत ते सारे आणि मी मात्र स्वतः कष्ट करून चैनीच्या आयुष्यासाठी धडपडतोय..
समीर बोलत होता पण आईच्या अश्रुंचा बांध फुटला होता पण ती काहीही न बोलता निमूटपणे आत निघून गेली. समीर रात्री झोपी गेला
तस आईने गुपचूप त्याच्या अंथरुणाजवळ एक डायरी आणून ठेवली...पहाटे समीर उठला आणि कोणाची अन कसली डायरी म्हणून
उत्सुकतेपोटी उघडून पाहू लागला... पाहताच तो रडवेला झाला, एक एक पान उलटतांना त्याचे अश्रू त्या डायरीच्या पानांवर ओघळत
होते.. आई दारात उभी राहून पाहू लागली अन मनोमन काय समजायचं ते समजली..
वाचून झाल्यावर समीर उठला आणि आईला पाहून त्याने तिला गच्च मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला. आणि म्हणाला की आई
आज कळतोय मला माझा बाप आयुष्यभर फाटक्या कपड्यात अन तुटक्या चपलेत का वावरला.. का तो संपत्ती जमवू शकला नाही?
कारण माझ्या सुखासाठी, शिक्षणासाठी तो पै पै जोडत राहिला आणि मला चांगल शिक्षण दिल. म्हणून आज मी मोठया कंपनीत रुजू आहे..
आज बाबांच्या जखमा त्या डायरीतल्या पानांवर पाहून समीर ती डायरी उराशी घट्ट पकडून रडू लागला... आणि बाबांचं सर्व क्रियाकर्म
आटोपेपर्यंत तिथेच राहण्याचा निर्धार त्याने केला.. बाबांना खरी श्रद्धांजली आता त्याच्या अश्रूतून ओघळत होती...
What's Your Reaction?






