वृद्ध आईबाबा..
बऱ्याच वर्षांनी शहरातून लेक आला घरी दाटून आल्या माऊलीच्या नयनी हर्षाच्या सरी! दृष्ट काढली त्याची गालगुच्चा घेतला बऱ्याच दिसानी पोर माझा मला भेटला!
वृद्ध आईबाबा..
बऱ्याच वर्षांनी शहरातून लेक आला घरी
दाटून आल्या माऊलीच्या नयनी हर्षाच्या सरी!
दृष्ट काढली त्याची गालगुच्चा घेतला
बऱ्याच दिसानी पोर माझा मला भेटला!
म्हणाली आता संगे घेऊन चल तूझ्या
एकत्र राहू करू सोबतीने मजा!
बाबां थकलेयत आता होतात त्यांचे हाल
पूर्वीसारखी नाही कणखर आता मी त्यांची ढाल!
सोबतीने खाऊ, सोबतीने राहू
नातवंडांचं कौतुक डोळे भरून पाहू!
आई असं बोलल्यावर चेहरा पडला त्याचा
शब्द सावरीत म्हणाला पास काढतो परवाचा!
गलबलून आलं आईला, आवरा आवर तिने केली
निरोपाची दवंडी ही सक्ख्या शेजारच्यांना दिली!
वाट पाहत बसले आईबाबा कधी येईल तो क्षण
सून नातवंडांच्या ओढीत हरखून गेले होते मन!
इतक्यात दारीं माणसं आली माहित नाही कुठून
खडबडून त्यांना पाहताच आईबाबा बसले उठून!
कोण तुम्ही लोक आला आहात कुठून?
अनोळखी दिसताय म्हणजे आलात वाटत चुकून!
अडवीत मुलगा चटकन म्हणाला
वृद्धाश्रमाची ही लोक
रहा आता तिथे तुम्हां मिळेल सर्वं सुख!
ऐकताच आईबाबांच्या काळजावर झालं चर्रर्र
म्हणाले लवकर कळालं एवढं तरी झालं बरं!
जा आता सुखाने आलास ज्या वाटेने
आम्ही करू आमची सोय राहू इथेच एकट्याने!
नकोय तुझा धीर की कसलाच कुठला आधार
सोबती अन साथीने दोघ आम्ही करू उरला संसार!
वाटलंच तर ये सरणावर आमच्या रचायला गोवर
उमगलंच आईबापाच्या मायेच गुपित जर तोवर!
बोलून इतकं आईबाबा ढसाढसा रडले
अन एकमेकांच्या कुशीत कायमचंच शांत पहूडले!!!!!
What's Your Reaction?
Like
7
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1