वसुबारस

दिवाळी हा सण मांगल्याचा, सुख समृद्धीचा, यशाचा, आनंदाचा, भरभराटीचा मानला जातो.. भारतातील सर्वात श्रेष्ठ सणामध्ये दिवाळी या सणाची गणना सर्वप्रथम केली जाते..

Oct 15, 2025 - 00:30
Oct 14, 2025 - 22:23
 0  16
वसुबारस



वसुबारस






दिवाळी हा सण मांगल्याचा, सुख समृद्धीचा, यशाचा, आनंदाचा, भरभराटीचा मानला जातो.. भारतातील सर्वात श्रेष्ठ सणामध्ये दिवाळी या सणाची गणना सर्वप्रथम केली जाते..

दिवाळीच्या पर्वात आनंदाला उधाण येते.. थोरामोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत साऱ्यांनाच या सणाचे विशेष आकर्षण असते.. आज आपण आपल्या या दीपोत्सव लेखात दिवाळीच्या सर्व दिवसांची, ति्थिंची एक एक करून माहिती घेऊया..

हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्त्विक आहे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणे तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते. शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते, त्यामुळे या पूजनाद्वारे गायीच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार केला जातो.

दिवाळीची खरी सुरुवात ही वसुबारस या दिवसापासून केली जाते.. आता वसुबारस म्हणजे काय, का साजरा केला जातो हा दिवस, त्याच्या मागचे कारण आणि विधी सारे काही या लेखात आपण जाणुन घेऊया...

वसुबारस ----

अश्विन शुद्ध द्वादशी ला वसुबारस येते... या दिवसापासून दिवाळीला खरी सुरुवात होते.. या दिवसापासून लोक नवीन वस्त्रे, अलंकार, परिधान करतात... आणि घर, अंगण सार काही दिव्यांनी सजवून टाकतात... या दिवशी गाय आणि तिचं वासरू यांची पूजा केली जाते...


हा सण साजरा करण्यामागची खरी अख्यायिका म्हणजे--

पूर्वी देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झाले त्या वेळी चौदा प्रकारची रत्ने बाहेर पडली होती.. त्यातच पाच प्रकारच्या कामधेनू या वेळी उत्पन्न झाल्या.. त्या म्हणजे  नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला आणि बहुला यांच्यासह पाच गाई उत्पन्न झाल्या होत्या. त्यांना लोकमाता म्हटलं गेलं आहे, कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या. त्यातील एक कामधेनू म्हणजे 'नंदा ' जी सर्वमनोकामना पूर्ण करणारी आणि इच्छित फळ देणारी म्हणून गौरविली गेली आणि म्हणूनच या नंदा नामक कामधेनूचे पूजन म्हणून आणि सर्वमनोकामना प्रित्यर्थ या दिवशी गायीचे पूजन करण्याची प्रथा रूढ झाली....

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते आणि या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अव‍तरित करते या कारणामुळे गायीची पूजा केली जाते.

वसू म्हणजे धन आणि बारस हा शब्द द्वादशी चा संबंध दर्शवतो म्हणून धनसंपत्ती, सुखसमृद्धी साठी गो माता पूजन केले जाते...

पुजाविधी---

या दिवशी सकाळी लवकर उठून सडासारवण करावी. गोडाधोडाचा स्वयंपाक बनवावा.. काही ठिकाणी पुरणपोळी नैवेद्य म्हणून बनवली जाते...ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. परंतु आपण आपल्या यथाशक्तीनुसार स्वयंपाक बनवून संध्याकाळी गोठ्यात जाऊन गाय आणि तिच्या वासराची पूजा करावी..-

सर्वात प्रथम गाईच्या दोन्ही पायांवर पाणी टाकून तिचे पाय धुवावे. मग हळदी कुंकू लावून फुल अर्पण करावे, तसेच कपाळालाही हळदी कुंकू लावून पूजा करावी. आरती ओवाळावी.. आणि नैवेद्य तिला खायला घालावा... वासराचीही पूजा अश्याच रीतीने करून दोघांना ही मनोभावे नमस्कार करून आपल्या सुखसमृद्धीची प्रार्थना करावी...

जमल्यास खालील गोमातेचे काही मंत्र दिले आहेत आपल्या कार्यसिधीसाठी आणि गोमातेचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तिचे मनोभावे पूजन करावे...

मंत्र खालीलप्रमाणे--

  • ⁠  ⁠सर्वकामदुधे देवि: 
    "सर्वकामदुधे देवी सर्वतीर्थाभिषेचिनि। पावने सुरभि श्रेष्ठे देवि तुभ्यं नमोस्तुते।।" 
    सर्व मनोकामना पूर्ती मंत्र
  • ⁠  ⁠नमो गोभ्यः श्रीमतीभ्यः: 
    "नमो गोभ्यः श्रीमतीभ्यः सौरभेयीभ्य एव च। नमो ब्रह्मसुताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः।।" 
    गोमाता नमस्कार मंत्र
  • ⁠  ⁠कामधेनु मंत्र: 
    "शुभकामायै विद्महे कामदात्र्यै च धीमहि। तन्नो धेनुः प्रचोदयात्।।" 
    समृद्धि आणि इच्छा पूर्ती मंत्र

    आपल्या श्रद्धा आणि आवश्यकतेनुसार कुठलाही एक मंत्र आपण म्हणू शकतो...


    #MarathiBlog #मराठीब्लॉग #MarathiLiterature #MarathiWriting 
    #मराठीलेखन #मराठीसाहित्य #MarathiWords #Manushabd #दिवाळी #वसुबारस

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0