धनत्रयोदशी/धनतेरस

या सणामागे एक मनोवेधक कथा प्रचलित आहे. पूर्वी कोणे एके काळी हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो असे भाकीत वर्तवले जाते.. या भविष्यवाणीमुळे तो राजा दुःखी होतो... आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात... लग्नानंतर

Oct 18, 2025 - 09:17
Oct 18, 2025 - 09:44
 0  13
धनत्रयोदशी/धनतेरस

धनत्रयोदशी/धनतेरस


#धनतेरस किंवा #धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते....


धनत्रयोदशी---

या सणामागे एक मनोवेधक कथा प्रचलित आहे. पूर्वी कोणे एके काळी हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो असे भाकीत वर्तवले जाते.. या भविष्यवाणीमुळे तो राजा दुःखी होतो... आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात... लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात आणि ते आत प्रवेश करू शकले नाहीत आणि तसेच परत फिरून जातात..

या कारणास्तव यम आपल्या जगात यमलोकात परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास 'यमदीपदान' असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर कणकेच्या पिठाचा दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात कारण दक्षिण दिशा ही यमदेवतेची दिशा असते.. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे....


धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा सांगितली जाते ती अशी की
इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास 'धन्वंतरी जयंती' असेही म्हणतात.


धनत्रयोदशीचे महत्त्व :

धनत्रयोदशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, सुख आणि समृद्धी येते. यासोबतच संपत्तीचा देव कुबेर यांचीही पूजा या दिवशी केली जाते. हिंदू मान्यतेनुसार, भगवान विष्णूचा अवतार भगवान धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला होता. त्याची पूजाही केली जाते.

धनत्रयोदशीची पूजा पद्धत---

या पूजेसाठी बसतांना आपण आपली घरात असलेली आयुर्वेदिक औषधे, जडिबुटी ही एका बाजूला पाटावर मांडावी व त्यांची ही पूजा करावी... कारण धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता असल्यामुळे आयुर्वेदाला विशेष महत्व प्राप्त होते..
पूजेसाठी शुद्ध वस्त्रे परिधान करून मग एका पाटावर भगवान धन्वंतरीची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ ठिकाणी स्थापित करा आणि पूर्व दिशेला तोंड करून बसा. त्यानंतर या मंत्राने भगवान धन्वंतरीचे आवाहन करावे. 'सत्यं च येन निरतं रोगं विधूतं, 'अन्वेषित च सविधिं आरोग्यमस्य।' आणि 'गूढं निगूढं औषध्यरूपम्, धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं।।' या मंत्राचा जप करावा.यानंतर पूजास्थळी आसन देण्याच्या भावनेने तांदूळ अर्पण करा. आचमनसाठी पाणी सोडा आणि भगवान धन्वंतरीला वस्त्र अर्पण करा. भगवान धन्वंतरीच्या मूर्तीवर किंवा चित्रावर अबीर, गुलाल ,पुष्प, आणि इतर सुगंधी वस्तू अर्पण करा. चांदीच्या भांड्यात खीर अर्पण करा. (चांदीची भांडी नसल्यास, इतर कोणत्याही भांड्यातही भोग देऊ शकता.) त्यानंतर आचमनसाठी पाणी सोडावे. मुखशुद्धीसाठी सुपारी, लवंग, सुपारी अर्पण करा. भगवान धन्वंतरीला शंखपुष्पी, तुळशी, ब्राह्मी इत्यादी पूजनीय औषधी अर्पण करा. यानंतर रोगाच्या नाशासाठी या मंत्राचा जप करावा. मंत्र - 'ओम रम रुद्र रोग नाशय धन्वंतरे वसा ।' त्यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ आणि दक्षिणा अर्पण करा. पूजेच्या शेवटी कर्पूर आरती करावी....

धन्वतरीचा हा सण,
आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !




#धनत्रयोदशीचेमहत्त्व #धनत्रयोदशीचीपूजापद्धत #Manushabd #MarathiKatha #ShatShabdKatha #MarathiStory 
#मराठीकथा #StoryInMarathi #ManushabdKatha #ShortStory #MarathiBlog

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0