फक्त तू...

ती पहाट रोज व्हावी तुझी छबी मला दिसावी न दिसेल छबी मजला ती पहाट खोटी ठरावी! मी साद देईन तुजला तू हाक मजला दयावी

Sep 27, 2025 - 16:40
 1  17
फक्त तू...

  फक्त तू ...

ती पहाट रोज व्हावी
तुझी छबी मला दिसावी

न दिसेल छबी मजला
 ती पहाट खोटी ठरावी !

मी साद देईन तुजला
तू हाक मजला दयावी

तुझी हाक नसेल तेव्हा
 माझी साद मूक व्हावी !

मी चालीनं वाट जेव्हा
तू हातात हात दयावा

तू नसता सोबतीला
तो प्रवास तेथ थांबावा !

मी चालीनं वाट काटेरी
तू फुलांची ती करावी

तू नसशील तेव्हा मात्र
अवनीला चीर पडावी !

What's Your Reaction?

Like Like 8
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 3