एक तरी कन्या असावी.....
एक तरी कन्या असावी साऱ्यांच्याच पोटी चुकतील सारी पातके जरी असतील कित्येक अन कोटी
एक तरी कन्या असावी.....
एक तरी कन्या असावी
साऱ्यांच्याच पोटी
चुकतील सारी पातके
जरी असतील कित्येक अन कोटी
तो असला दिवा
तरी ती असते ज्योती
कशी वर्णावी प्रकाशाची
तिच्यावीन महती ?
तो पिढ्या वाढवतो
ती पिढ्या घडवते
अनेक जन्म उद्धरोनी
ती पुण्य पदरात घालते
तो वटवृक्ष
ती वेल त्याची होते
गगनास घालोनी साद
ती उंच उंच जाते
तो असला काठी
तरी आधार ती असते
थरथरणाऱ्या हातांना
तीच सावरून घेते
तिच्याशिवाय कसे हो
उद्धरतील वंश
उद्धरायला त्यासाठी
तीच होते अंश
जन्मोनी ती पोटी
भाग्यास मिळते झळाळी
उमलावी अशी सुगंधाची
साऱ्यांच्याच घरी कळी
अगणित पुण्य प्रसादाने
ती जन्मते उदरी
बांधून ठेवते उराशी
संस्कार, शिस्तीची शिदोरी!!!!!
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
3