एक फुलपाखरू
रंगीबेरंगी फुलपाखरू होत एक भिरभीरणार या फुलातुन त्या फुलाचा मकरंद चाखणार इकडून तिकडे, तिकडून इकडे मनसोक्त बागडणार
एक फुलपाखरू...
रंगीबेरंगी फुलपाखरू होत एक भिरभीरणार
या फुलातुन त्या फुलाचा मकरंद चाखणार
इकडून तिकडे, तिकडून इकडे
मनसोक्त बागडणार,
नव्हतं भय कसलं दिलखुलास जगणार
होत ते बेधुंद, स्वछंद आणि मुक्त
वाटल जेव्हा फुल पानांच्या कानात व्हायचं व्यक्त
मनसोक्त हिंडणार, खूप खूप बागडणार
आनंदाचे झोके घेत हिरव्या अंगावर लोळणार
कानगोष्टी, गुजगोष्टी, हितगुज करणार
वाटेल तेव्हा हवं तस, चहुंकडे फिरणार
नव्हता कसला बंध , नव्हता कसला पाश,
पण क्षणातच घोगावणाऱ्या वाऱ्याने केला त्याच नाश
कोणास ठाऊक कुठून तरी
धावत आलं सुसाट, उचलून नेलं दुरवर
अडवली त्याची वाट
घेतलं त्याला कवेत आणि उंच उंच नेलं
कोणास ठाऊक कुठे पण दूर फार नेलं
नव्हतं ठिकाण ओळखीचं, गाव ही अनोळखी
खूप खूप शोधलं पण भेटलं नाही सोबती
हिरमूसलं, रडलं, कोपऱ्यात जाऊन दडलं
अनोळख्या वाटेवर एकटच जाऊन पडलं
एकटच राहील मग तिथे, अव्यक्त अन अबोल होऊन
आयुष्य सरल तिथेच पण मनातलं मनातच गेलं राहून...
#Manushabd #MarathiKavita #MarathiPoem #मराठीकविता
#MarathiLiterature #भावना #Kavita #MarathiWords #मराठीलेखन #PoetryInMarathi
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0