अज्ञत
हरविली वाट स्वतःची, गावं विसरलो माणुसकीचा, आरश्यातल्या प्रतिबिंबातही, चेहरा न उरला ओळखीचा !!!

अज्ञत
हे वारे गतिमानतेचे,
भिरभीरले नभोअंगणी,
जो तो झाला अनोळखी,
ओळखीचा ना येथ कुणी.
स्पर्धा अन चढाओढीचा,
खेळ सुरू हा नित्य निरंतर,
जिंकायचेच येथ साऱ्यांना,
खेळण्यावाचून नाही गत्यंतर.
प्रवासाच्या दिशा येथल्या,
गर्दीने डबडबलेल्या,
वेळ नाही येथ कुणा,
वाटा साऱ्या गजबजलेल्या.
सारेच वाटती अनोळखी,
जग हे भासे परके परके,
आपुलेच खरे तर सारे सभोवती,
परी नवख्यांचे ओढीले बुरखे.
चढाओढीच्या रांगेमध्ये,
हरवून बसलो मी ही स्वतः मग,
प्रतिबिंब ही लाजले स्वतःचे,
अज्ञत ते ही झाले मग.
हरविली वाट स्वतःची,
गावं विसरलो माणुसकीचा,
आरश्यातल्या प्रतिबिंबातही,
चेहरा न उरला ओळखीचा !!!
What's Your Reaction?






