विठुमाई
पंढरीच्या विठुराया कस चाललंय तूझ्या घरी काय म्हणते तुझी रखुमाई आहे न ती बरी?
विठुमाई
( विठुराया काही चुकलं असेल तर क्षमस्व🙏 पण आजची शब्दरचना फक्त माझ्या रखुमाईसाठी😊,
जी युगे अठ्ठावीस उभी आहे तुझ्यासारखीच, तुझ्यासाठी कमरेवर ठेवून हात, तुझी करत साथ....)
पंढरीच्या विठुराया कस चाललंय तूझ्या घरी
काय म्हणते तुझी रखुमाई आहे न ती बरी?
ऐकते न तुझं सार की नुसतीच टर टर
तू ही ऐकून घेतोस की चिडतोस तिच्यावर?
हे आणा ते आणा तुझ्याकडे ही असत का रे
तू ही आणून देतोस की टाळाटाळ करतो बरे?
चिडते, रागावते, ओरडते का मग रखुमाई
समजावतोस तिला की म्हणतोस कटकटी बाई?
वेळ नाही माझ्यासाठी म्हणून करत असते का रे वटवट
माफी मागतोस तिची की म्हणतोस बंद कर तुझी बटबट?
कौतुक करतोस का कधी तीच तिने पंचपक्वान्न बनवल्यावर
की नुसतंच नाक मुरडतोस अळणी कधी झाल्यावर?
विटेवरचे हात कधी घेतोस का रे खाली
टिपतोस का कधी घाम तिचा जर घामाघूम ती झाली?
कळलंय मला काही आमच्याहून जग नाही तीच वेगळं
ऐकून घेत असेल आमच्यासारखच सहन करत असेल सगळं!
म्हणूनच तर कटेवर कर घेऊन राहिला आहेस दूर उभा
तिच्यासाठी शेजारी ठेवलीयस तरी का रे जागा?
भक्तांच्या गर्दीगोंधळात ती दुरून तूला पाहते
सावळ रुपडं बघून तुझं मनोमन सुखवते!
रखुमाई माझी ती त्याग, सहनशक्ती, करुनेची मूर्ती
नाराज नाहीच तुझ्यावर, प्रसन्नच सदा मनी ऐकून तुझी कीर्ती!!
#MarathiPoem #MarathiKavita #मराठीकविता #Kavita #PoetryInMarathi
#मराठीशब्द #भावकविता #ManushabdKavita
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0