काय चोरलंस ?
काय ग ये, काय चोरलंस? दाखव जरा काही नाही ताई, कोणी पाहिलं तर ओरडेल म्हणून गुपचूप आले होते दुपारच्या वेळी...

काय चोरलंस ?
काय ग ये, काय चोरलंस? दाखव जरा...
काही नाही ताई, कोणी पाहिलं तर ओरडेल म्हणून गुपचूप आले होते दुपारच्या वेळी...
लेकरू आजारी आहे घरी, भुकेने कळवळतोय म्हणून थोडे दाणे गोळा केले मूर्तिजवळून...
इतक्यात कोणीतरी ओरडत आलं...
अन सगळे दाणे गळून पडले खाली तिच्या फाटक्या पदरातून...
लेकरू गेलं तीच कळताच त्या दगडाच्या मूर्तिकडे सुन्न होऊन पाहत बसली..
दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू, इतकंच तिच्या रडवेल्या डोळ्यातून अन मुक्या झालेल्या शब्दातून निघालं असेल...
What's Your Reaction?






