तिचा एकांत...
तू होतोस अरे अबोल, आणि शांत मी मात्र तेव्हा भोगत असते एकांत
तिचा एकांत...
तू होतोस अरे अबोल, आणि शांत
मी मात्र तेव्हा भोगत असते एकांत
तू बाहेर पडतोस आणि हसरा नाचरा होतोस
मी मात्र घरातच खिन्न, उदास असते
असतात तुझ्या सोबतीला खूप तेव्हा सारे
मी मात्र एकटीच, सोबतीला फक्त वारे
तू हसतो, खिदळतो, चार चौघात रमतो
मी मात्र एकाकी तेव्हा एकांत मला छळतो
तू दिवसभर हसून, बोलून, रमून घरी येतो
घरी येताच मात्र दमलेला असतो
एका तुझ्या शब्दासाठी मी असते झुरत
तू मात्र तुझ्याच विश्वात बसतो रमत
तू तुझ्याच चुका असूनही, माझ्यावर रुसतो
अबोल आणि शांत राहून शिक्षा मला करतोस
मी भोगते तरीही मुकाट्यानं न केलेल्या चुकांची शिक्षा
कारण ठरलंय न तसच की स्त्रीचीच असते अग्निपरीक्षा..
#Manushabd #MarathiKavita #MarathiPoem #मराठीकविता
#MarathiLiterature #भावना #Kavita #MarathiWords #मराठीलेखन #PoetryInMarathi
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0