येतोय मी लवकरच...
येतोय मी लवकरच सारी तयारी झाली का? मला हवी तशी अन तशीच...

येतोय मी लवकरच सारी तयारी झाली का? मला हवी तशी अन तशीच अगदी केली का?!
लावली का तोरणे दारीं गोड मिष्ठान्ने बनवली का घरी केली का सजावट सारी हवी तशीच झाली का तयारी?!
मंद मधुर आवाजातली गाणी मला ऐकायचीयत भावभक्तीच्या रंगात रंगलेली भक्त मंडळी मला पाहायचीयत!
ढोल ताशा, मृदूंग, तबला वाद्ये माझी आवडती डीजे नकोच मला आवाज त्याचा असतो किती!
नृत्य आवडत मला भावभक्तीच्या गीतावर च नको ते बिभत्स नाचणं मुन्नी अन शिला च्या गाण्यावरच!
साफ सफाई, स्वच्छता आवडते हो मला पण मागल्या साली पाठीमागे माझ्या जो तो थुंकून गेला! |
जिकडे तिकडे प्लास्टिक कचरा अन घाण कुठे म्हणजे कुठेच पूर्वीसारखं आता वाटत नाही छान!
नुसताच धिंगाणा, गोंगाट अन बऱ्याचदा मारामारी जो तो पडतोय इथे एकमेकांनवरती भारी!
पूर्वीसारखी भावभक्ती आता कोनातही दिसत नाही भक्तीला इथल्या संस्कारांचा आता रंग चढत नाही!
मी तर भक्तीचा भुकेला तुम्हीच बाजार केला माझा रीतीभाती, संस्कार, निसर्ग डावलून बिभत्सतेचा केला गाजावाजा!
असला गणेशोत्सव मला खरं तर नाराज करतो पण वचन दिलंय ना मी म्हणून दरवर्षी नित्यनेमाने येतो!
पण कृपा करून साऱ्यांनी टाळा हे सगळं नका चढवू उत्सवाला बिभत्सतेच अजून रुप वेगळं!!!! |
What's Your Reaction?






